औरंगाबादेतील आधुनिक बसस्थानक कागदावरच; उद्देशालाच हरताळ

Aurangabad

Aurangabad

Tendernama

औरंगाबाद (Aurangabad) : राज्यातील बहुतांश बसस्थानके जुनी झाली आहेत. यातील काही बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यातील एक औरंगाबादमधील मध्यवर्ती बसस्थानकाचा देखील समावेश करण्यात आला होता. पन्नाशीची उमर गाठलेली या बसस्थानकाची इमारत मोडकळीस आली आहे. ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार होते. ४.६ एकर जागेवर नवीन मध्यवर्ती बसस्थानक उभारले जाणार होते. वास्तुविशारदाने दिलेला नवीन नकाशा व प्राथमिक अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देखील मिळाली होती. त्याचे सविस्तर अंदाजपत्रकात अंतिम मंजुरी मिळाली होती. पण सरकारच्या आधुनिक बसस्थानकाच्या संकल्पनेच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला.

Aurangabad

मुंबई ते नवी मुंबई अंतर अवघ्या काही मिनिटांत करा पार..

असा होता विकास आराखडा

- विकास आराखड्यात ही अद्ययावत बसस्थानकाची नवीन इमारत इंग्रजी ‘वाय’ या आकारात साकार होणार होती.

- बसस्थानकाचे प्रशस्त व देखणे प्रवेशद्वार पूर्वेस दर्शवण्यात आले होते. त्यात ऐतिहासिक शहराची ओळख जपत या प्रवेशगृहाच्या दक्षिण व उत्तर बाजूला येथील बीबी का मकबरा, पाणचक्की, शहरातील दरवाजे, देवगिरी किल्ला, जागतिक वारसा असलेले वेरूळ व अजिंठा लेणी याचे सर्वांना दर्शन व्हावे यासाठी फायबर म्युरलमध्ये या प्रतिकृती बनविण्यात येणार होत्या.

- प्रवेशद्वारातून आत गेल्यावर भव्य ‘क्रश हॉल’ त्यात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची रेलचेल दर्शवण्यात आली होती.

Aurangabad

IMPACT : अखेर पुणे-सातारा महामार्गावरील रिलायन्सचा ठेका रद्द

- पुढे उजव्या व डाव्या बाजूस जेनेरिक मेडिकल स्टोअर्स , तिकीट आरक्षण कार्यालय, वाहतूक नियंत्रण कार्यालय, पार्सल रूम, महिलांसाठी हिरकणी कक्ष तसेच शिवशाही, शिवनेरीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांसाठी वातानुकूलित कक्ष दर्शवली होती.

- सध्याच्या बसस्थानकात १७ प्लॅटफार्म आहेत. मात्र, नवीन बसस्थानकात २८ प्लॅटफार्म दाखवली होती. त्यात प्रथम दोन्ही बाजूस प्रत्येकी ८-८ प्लॅटफार्म, त्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच पुढील बाजूस प्रत्येकी ६-६ प्लॅटफार्म व त्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, मध्यभागी मुख्य नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) मधून सर्व २८ प्लॅटफार्म दिसू शकतील , अशी रचना या कक्षाची करण्यात आली होती.

- आसपास १२ छोटी दुकाने उभारण्यात येणार होते, तसेच विनावाहक गाड्यांच्या तिकिटासाठी ४ स्वतंत्र खिडक्यांची व्यवस्था केली होती. हे सर्व प्लॅटफार्म छताने अच्छादित केले जाणार होते.

- बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांसाठी दोन ठिकाणी सुमारे सव्वा एकर जागेवर वाहनतळे उभारण्यात येणार होती. त्यात आप्तेष्टांना बसमध्ये बसवून त्वरित निघून जाणाऱ्या वाहनधारकांच्या दुचाकी व चारचाकीसाठी बसस्थानकाच्या समोरील बाजूस वाहतळ. तर दुसरीकडे वाहन उभे करून परगावी जाणार्या प्रवाशांसाठी बसस्थानकाच्या उत्तरेस (जिथे निवासस्थाने होती) वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती.

- त्याच ठिकाणी समोरील बाजूस रिक्षास्टँडसाठी जागा ठेवण्यात आली होती. बसस्थानकामधून उत्तर बाजूस वाहनतळामध्ये वाहन घेण्यासाठी प्रवाशांना जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात येणार होता.

Aurangabad

औरंगाबाद 'कर'दात्यांवर दिवसा धूळफेक

- बसस्थानकाचे पाणी फेरभरण करण्यात येणार होते. यासाठी अंडरग्राऊंड वॉटर टँक करण्यात येणार होते. पावसाळ्यात जमा झालेल्या पाण्यावरच वर्षभर बसस्थानकात पाणी पुरविले जाणार होते. याशिवाय बसस्थानकाला ग्रीन बिल्डिंगची संकल्पना येथे राबविण्यात येणार होती.

- पहिल्या मजल्यावर उत्तर दिशेला १०० ते १२० आसनक्षमतेचे चित्रपटगृह संकल्पीत केले होते. तर दक्षिण बाजूस वाहक व चालकांना राहण्यासाठी प्रशस्त हॉल, अकाऊंट कार्यालय तसेच वाहक-चालकांच्या खुली व्यायामशाळा, इनडोअर गेम्स, तसेच पहिल्यावर खुले उपहारगृह असी वास्तु विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आली होती.

- भविष्यातील स्मार्ट सिटी व लोकसंख्या वाढीचा विचार करून मध्यवर्ती बसस्थानकाचे डिझाईन तयार करण्यात आले होते. बसस्थानकावर नव्हे तर विमानतळावर आल्यासारखे प्रत्येकाला वाटेल व औरंगाबादकरांना अभिमान वाटावे अशा गप्पा बसस्थानकाच्या भूमिपूजनाच्या दिवशी एस.टी.महामंडळाचे अधिकारी आणि माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मारल्या होत्या.

Aurangabad

औरंगाबाद खड्ड्यात; महापालिकेने केली औरंगाबाद खंडपीठाची दिशाभूल

प्रवाशांचा जीव गेल्यावर बसस्थानकाची उभारणी करणार काय ?

मध्यवर्ती बसस्थानक बांधून ५० वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. आज घडीला बसस्थानकाची पूरचंड दुरवस्था झालेली आहे. प्लास्टर निखळल्याने जागोजागी छतातील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. ठिकठिकाणी भिंतीतून पाणी गळते. इमारतीवर ठिकठिकाणी झाडे वाढली असून, त्याची मुळे जमिनीपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे बसस्थानकाची ही धोकादायक अवस्था पाहून प्रवाशांचा जीव घेतल्यावर आधुनिक बसस्थानकाची उभारणी करणार काय ? असा सवाल औरंगाबादकर करत आहेत.

Aurangabad

मेरा शहर बदल रहा है...; ‘रोप-वे’ बस सुरू होणार

सिडको बसपोर्ट देखील रखडले

सिडको बसस्थानकाच्या जागी विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानक उभारण्याचे नियोजन आहे. मध्यवर्ती बसस्थानकाबरोबरच बसपोर्टचे उद्घाटन १३ ऑगस्द २०१९ रोजी माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु सिडकोकडे अद्याप एस.टी.महामंडळाने वाढीव चटई निर्देशांकाने दंड न भरल्याने अधवा हमीपत्र आणि सुधारित नकाशे न दिल्याने सिडकोने एनओसी दिली नाही. दुसरीकडे सिडकोची लीजडीड आणि एनओसी आणि बांधकाम परवाना नसताना नोंदणीकृत विकासकरारनामा करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता संदीप वायसळ पाटील आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांच्या तक्रारीवरून हे प्रकरण चौकशीच्या फेर्यात अडकल्याने एकीकडे मध्यवर्ती बसस्थानकाचे आधुनिकीकरण आणि दुसरीकडे सिडको बसपोर्ट कधी होणार असा सवाल प्रवाशातून होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com