Vashim : एका वर्षात पूर्ण कराव्या लागणार 423 नळ योजना!
वाशिम (Vashim) : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात 559 गावांसाठी पाणीपुरवठ्याच्या 425 योजना मंजूर असून, 20 ऑक्टोबरपर्यंत 98 योजना पूर्ण झाल्या. एका वर्षात 423 नळयोजनांची कामे पूर्ण करावी लागणार आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जल जीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे प्रति व्यक्ती 44 लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. जिल्ह्यात 459 गावांसाठी 521 नळयोजना प्रस्तावित आहेत. या सर्व योजनांची अंदाजपत्रके, तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता पूर्ण झाली असून कार्यारंभ आदेशही दिलेले आहेत.
2024 पर्यंत या योजनांची कामे पूर्ण करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यात सन 2021 पासून जलजीवन मिशनला सुरुवात झाली असून, पावणेतीन वर्षात आतापर्यंत 28 नळयोजनांची कामे पूर्ण झाली असून, या योजनेंतर्गत पाणीपुरवठा सुरू झाला. दुसरीकडे आणखी एका वर्षात 423 नळ योजनांची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. या योजनांची कामे प्रगतीपथावर असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.
नळ योजनेच्या कामावर एक नजर
कारंजा - 95, मालेगाव 91, मंगरुळपीर - 98, मानोरा- 62, रिसोड 81, वाशिम 94
मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक कामे
जिल्हा परिषद अध्यक्षांचे 'होमटाऊन असलेल्या नळयोजनांची सर्वाधिक 98 कामे मंजूर आहेत. इतर तालुक्यांच्या तुलनेत नळयोजनेची अधिकाधिक कामे पूर्ण करण्यात देखील मंगरूळपीर तालुक्याने आघाडी घेतली. 20 ऑक्टोबरपर्यंत 30 नळयोजनेचे पाणी नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचले.
पूर्ण झालेली कामे :
कारंजा - 22, मालेगाव - 13, मानोरा - 14, रिसोड - 6