PMAY : नागपुरातील 840 जणांची उद्या होणार स्वप्नपूर्ती; हे आहे कारण...

PM Awas Yojana
PM Awas YojanaTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूर महानगरपालिकेच्या झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या प्रकल्पातील सदनिकांसाठी शनिवार 21ऑक्टोबर 2023 रोजी संगणकीय सोडत (लॉटरी) होणार आहे.

शनिवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता संगणकीय सोडत प्रक्रियेला सुरूवात होईल. ज्या नागरिकांनी विहित मुदतीत नोंदणी शुल्कासह अर्ज सादर केले आहेत, अशा सर्व नागरिकांनी संगणकीय सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

PM Awas Yojana
Nashik : नाशिक तालुक्यात मध्यरात्री प्रशासनाची मोठी कारवाई; सारूळच्या 5 क्रशरवर...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामठी रोडवरील पिवळी नदी जवळ मौजा वांजरा येथे नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘स्वप्ननिकेतन’ हे 480 सदनिकांचे प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामध्ये 28.21 चौ.मी./303.65 चौ. फूट चटई क्षेत्रफळ असलेले 1BHK सदनिका आहेत. सदनिकेची एकूण बांधकामाची किंमत रु. 11,51,845 (अंदाजीत) एवढी असून प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत शासनातर्फे रु. 2,50,000 रुपये अनुदान असून सदनिकेचे विक्री मूल्य रु. 9,01,845 रूपये आहे.

या व्यतीरिक्त इलेक्ट्रीक मीटर, जीएसटी, रजीस्ट्री किंमत, स्टॅम्प डयुटी, सोसायटी डीपॉझीट, ॲग्रीमेंन्ट सेल डीड करीता अतिरिक्त शुल्क अदा करावे लागेल. सदनिका खरेदी करण्याकरिता ऑनलाईन माध्यमातून मनपाच्या पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला असून 480 सदनिकांसाठी 1819 अर्ज प्राप्त झाले आहेत.

PM Awas Yojana
Nashik : शिंदे गटाची भाजपवर मात! नाशिकचे IT पार्क आता राजूर बहुल्यात

अशी असणार व्यवस्था

प्रकल्पातील 480 सदनिकांमध्ये 50 टक्के अर्थात 240 सदनिका अराखीव असून 13 टक्के अनुसूचित जाती, 7 टक्के अनुसूचित जमाती, 30 टक्के इतर मागास प्रवर्ग आणि 5 टक्के –समांतर आरक्षण दिव्यांग प्रवर्गाकरिता राखीव आहेत. प्रकल्पामध्ये बाग, कम्यूनिटी हॉल, लॉबी, लिफ्ट आणि पाणी पुरवठा करणाऱ्या पंपला लागणा-रा वीज निर्मितीसाठी सोलर पॅनलची सुविधा, सौर उर्जेमार्फत गरम पाण्याची सुविधा, पर्जन्य जलसिंचन प्रकल्पाची सुविधा, जलनि:स्सारण इ. सुविधाचा समावेश आहे.

ऑनलाईन लॉटरी नंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी व एकत्रित प्रतीक्षा यादी नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com