
नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्हा परिषदेचे (Nagpur ZP) उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी झिंगाबाई टाकळी कोराडी रोड येथील बॉक्सकूलर जवळ जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर स्ट्रीट फूड हब करण्याचा निर्णय बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला. उत्पन्नाचे स्त्रोत वाढावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून फूड हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जि .प. उपाध्यक्षा व समिती अध्यक्षा कुंदा राऊत यांनी सांगितले.
तसेच उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी सांगितले की, फूड हब उभारण्याचा ठरावाला मंजूरी देण्यात आली आहे. आणि लवकरच या संबंधित टेंडर जिल्हा परिषद काढेल आणि स्ट्रीट फूड हब मध्ये जागा भाडेतत्वावर देण्यात येणार. लवकरच या प्रस्तावा साठी पुढील कार्य हाती घेऊ अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली.
स्थानिक लोकांना मिळणार रोजगार
जिल्हापरिषदेच्या स्ट्रीट फूड हब सुरु करण्याच्या निर्णयामुळे स्थानिक लोकांना रोजगार सुद्धा मिळेल, आणि जिल्हापरिषदेच्या उत्पन्नात भर सुद्धा होणार. सोबतच जे खाण्याचे शौकीन आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. सोबतच याचा फायदा कोराडी येथे आई महालक्ष्मी जगदंबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना सुद्धा घेता येईल. त्याचप्रमाणे काटोल रोड येथील जि.प.च्या शाळेचे मैदान विकसित करून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्पोर्टिंग क्लबला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णयही घेण्यात बैठकीत घेण्यात आला. यामुळे जिल्हा परिषदेला उत्पन्न मिळेल तसेच मुलांना खेळाच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळेल.