Gondia : 408 एकरात उभारणार 39 सौरऊर्जा उपकेंद्रे

CM Solar
CM SolarTendernama

गोंदिया (Gondia) : वीजपुरवठा मिळत नसल्याने कित्येकदा शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण होत असून, अशात पिकांपासून हात धुवावे लागतात. मात्र आता शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0' सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात 39 उपकेंद्रे तयार केली जाणार आहेत.

CM Solar
Nashik : डीपीसीच्या निधीतून तिन्ही खासदारांना वगळले? दादा भुसेंचा मोठा निर्णय

शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी दिवसा आणि रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जात आहे. परिणामी त्यांना कित्येक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही परिस्थिती बदलून शेतीला दिवसा व सवलतीच्या दरात वीजपुरवठा कसा करता यावा, यासाठी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ला गती देण्याचे काम केले आहे. महावितरणकडून योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.

'महसूल'ला जागा

या योजनेसाठी राज्य शासनाने महसूल प्रशासनाला आवश्यक इतकी जागा शोधण्यासाठी 8 मे 2023 तसेच 2 नोव्हेंबर 2022 रोजी आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासन कामाला लागले आहे.

वीज उपलब्धी वाढणार का?

या योजनेतून शेतकऱ्यांना सोलरच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. सोलरच्या वापरामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या तुलनेत जास्त वीज उपलब्ध होणार आहे.

CM Solar
Mumbai : कोस्टल रोडसाठी आणखी 6 महिन्यांची प्रतीक्षा; खर्चातही 725 कोटींची वाढ

काय आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना?

महावितरणने ही योजना सुरू केली असून त्याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी चाहिनी योजनेंतर्गत सौर पॅनेल बसवून वीजपुरवठा केला जाणार आहे. या योजनेंतर्गत सन 2025 पर्यंत 30 टक्के कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्याचे उद्दिष्ट हे 'मिशन 2025' म्हणून निश्चित केले आहे. त्यानुसार, जिल्ह्यात महावितरणकडून कार्य सुरू करण्यात आले आहे.

अवघे एक रुपया भाडे

योजनेंतर्गत शासकीय जागेसाठी 1 रुपया भाडेतत्त्वावर व निमशासकीय जागेसाठी 50 हजार रुपये प्रतिएकर वार्षिक भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत घेतला आहे.

408 एकर जागेसाठी 26 प्रस्ताव

योजनेंतर्गत महावितरणकडून 39 उपकेंद्रांसाठी 408 एकर जागेचे 26 प्रस्ताव आले आहे. तहसीलदारांकडे प्रस्तावित करण्यात आले आहे. तहसीलदारांकडून जागेची पडताळणी केली जात आहे. महाराष्ट्र शासन व महावितरण जलद गतीने सौर ऊर्जीकरण करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी अभियान तत्त्वावर करीत आहे. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी माहिती पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंता, गोंदिया परिमंडळ यांनी दिली. जिल्ह्यात 39 उपकेंद्रांत 11 केव्ही व 33 केव्ही वीजवाहिन्यांवर कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com