Nashik Municipal Corporation: वीज प्रकल्पाला मिळेना ओला कचरा

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) ओल्या कचऱ्याचे संकलन करून त्यापासून वीजनिर्मिती करणारा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारला आहे. या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची ९९ हजार युनिट वीज निर्मिती क्षमता आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी रोज १५ मेट्रिक टन फूड वेस्टेज म्हणजेच ओला कचरा आवश्‍यक आहे.

Nashik Municipal Corporation
KDMC: कोविड सेंटर टेंडरमध्ये ३०० टक्के तफावत; डॉक्टरच बनला ठेकेदार

मात्र, सध्या घंटागाडीच्या माध्यमातून शहरातून केवळ दीड टन फूड वेस्टेज संकलित होऊन प्रकल्पातून केवळ २०० ते २५० युनिट वीजनिर्मिती होते. महापालिकेने कचरा संकलनासाठी पाच वर्षांसाठी ३७६ कोटींचा ठेका दिला आहे. मात्र, ठेकेदाराकडून कचऱ्याचे विलगीकरण होत नसल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे. यामुळे महापालिका आयुक्तांनी ओला कचरा, सुका कचरा अशी विभागणी कशी करावी, यासाठी शहरातील हॉटेलचालकांची शिकवणी घेतली.

Nashik Municipal Corporation
Nashik: 4500 कोटींच्या 'या' कामासाठी मनपाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक महापालिकेने पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत २०१७ मध्ये जर्मनीच्या सहकार्याने विल्होळी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारला. त्यासाठी सात कोटी रुपये खर्च आला. ओला कचऱ्याद्वारे वायोगॅस तयार करून त्याद्वारे वीजनिर्मिती केली जाणार होती. मात्र, ओल्या कचऱ्याअभावी याचा फटका वीज निर्मितीला वसत आहे. प्रकल्पाची महिन्याची वीज निर्मितीची क्षमता ९९ हजार युनिट असताना सद्यस्थितीत दरमहा अडिचशे युनिटपर्यंत वीज निर्मिती होत असल्याचे चित्र आहे. ज्यावेळी हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा दरमहा ९९ हजार युनिट वीज निर्मिती करण्याचे उदिष्ट होते.

Nashik Municipal Corporation
Mumbai-Delhi Expressway : प्रगतीचा विलोभनीय महामार्ग! कामाचा वेग..

विशेष म्हणजे तयार केली जाणारी वीज महापालिका महावितरणला विकणार होती. सध्या या वीज निर्मितीमुळे केवळ महापालिकेची वीज विलात वचत होत आहे. पण, घनकचरा व्यवस्थापन विभाग ओला कचरा संकलन करताना अपयशी ठरत आहे. दिवसाला जेमतेम दीड टन कचरा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पापर्यंत पोहचवला जात आहे. त्यामुळे वीज निर्मितीचे प्रमाण थेट महिन्याला अडीचशे युनिटपर्यंत घसरले आहे. शहरात ओला कचरा मोठा प्रमाणात असला तरी तो संकलित करून 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पावर नेण्यात घनकचरा व्यवस्थापन विभागाला अपयश येत आहे. या प्रकल्पाची महिन्याची वीज निर्मितीची क्षमता ९९ हजार इतकी असताना सद्यस्थितीत ओल्या कचऱ्याअभावी हे प्रमाण दरमहा अडीचशे युनिटपर्यंत पसरले आहे. त्यामुळे इतर प्रकल्पांप्रमाणे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प देखील महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत आहे.

Nashik Municipal Corporation
BMC : स्कायवॉक सुशोभीकरणासाठी ८० कोटी; 'या' कंपन्यांना टेंडर

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावर महापालिकेचे सहा कर्मचारी काम करतात. त्यांच्या वेतनावर महिन्याला दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. मात्र, वीज विक्रीतून महिन्याला तीस हजार रुपये उत्पन्न मिळते. ते पाहता आमदनी आठन्नी खर्चा रुपया अशी या प्रकल्पाची अवस्था झाली आहे. ओल्या कचऱ्याद्वारे वायोगॅस तयार करून त्याद्वारे वीज निर्मिती केली जाणार होती. उशिराने का होईना घनकचरा संकलन विभागाने हॉटेल, खाद्यपदार्थांचे दुकाने येथील ओला कचरा संकलनासाठी रात्रीच्या वीस घंटागाड्या सुरू केल्या आहेत. तसेच यावावत हॉटेलचालकांची बैठक बोलावून त्यांचे ओला कचरा संकलनाबाबत प्रबोधन केले. त्यात, ओला कचरा, सुका कचरा वेगळा हवा असल्याचे सांगून वेस्टेज फुड वेगळ्या कंटेनरमध्ये द्यावे, असे आवाहन केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com