Pune: 'त्या' हॉटेल मालकांना पालिका दणका देणार का?

PMC Pune
PMC PuneTendernama

पुणे (Pune) : निवासी मिळकत असलेल्या बंगल्यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहेच, पण त्यासाठी महापालिकेने (PMC) कोणतीही परवानगी दिलेली नाही. अशा व्यावसायिकांवर कारवाई करून त्यांना बिगर व्यावसायिक कर लावावा आणि अनधिकृतपणे वापर केल्याने तीनपट कराची आकारणी करावी असे आदेश प्रशासनाने काढले आहेत.

PMC Pune
CM Shinde: धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा अन् नालेसफाईवर..

पुणे महापालिकेचा खर्च वाढत असताना महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत म्हणून मिळकतकर विभागावरच प्रशासनाचा भार असतो. त्यासाठी जुनी थकबाकी वसूल करण्यासह इमारतीच्या वापरात बदल झाल्यास त्यानुसार कर आकारणीही केली जाते.

गेल्या काही वर्षांत शहराची हद्द वाढलेली असली, तरी शहराच्या मध्यवर्ती भागात व्यवसायासाठी मोक्याची जागा मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे जुन्या निवासी इमारती पाडून तेथे फ्लॅटसह बँक, हॉटेल, दुकाने, कार्यालये याची व्यवस्था केली जात आहे. परंतु, नव्या वास्तू विकत घेण्याऐवजी एखादे घर, बंगला भाड्याने घेऊन तेथे हॉटेल, रेस्टॉरंट, पब सुरू केले जात आहेत. यामध्ये काही भागात पहाटेपर्यंत पब, रेस्टॉरंट, बार सुरू राहत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.

निवासी जागेत पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर गाड्या लावल्या जात असल्याने त्या भागात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे याविरोधात स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत.

PMC Pune
महावितरणच्या सोलर रुफटॉप योजनाला मोठा प्रतिसाद; 52 मेगावॅट वीज..

त्यामुळे निवासी मिळकतीमध्ये बांधकाम विभागाकडून वापरात बदल करण्यासंदर्भात कोणतीही परवानगी घेतली नाही, अशा मिळकतीमध्ये हॉटेल, बार, पब, रेस्टॉरंट, खानावळ अनधिकृतपणे सुरू केल्यास त्यांच्यावर बिगर निवासी कर लावला जाणार आहे. तसेच त्याची तीनपट दराने वसुली करावी, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

या भागात प्रमाण जास्त
भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता, जंगली महाराज रस्ता, कोरेगाव पार्क, विमाननगर यासह औंध, बाणेर, बालेवाडी, कोथरूड या भागात निवासी मिळकतींमध्ये हॉटेल, पब, रेस्टॉरंट सुरू करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.

रुफ टॉप हॉटेलला तीनपट कर
गेल्यावर्षी बाणेर येथील एका इमारतीवरील रुफ टॉप हॉटेलला मोठी आग लागली होती. सुदैवाने, यामध्ये दुर्घटना घडली नाही. पण या हॉटेलमधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून मिळकतकर विभागाच्या पेठ निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीतील रुफ टॉप हॉटेलसह फ्रंट मार्जिन, साइड मार्जिनमधील हॉटेलवर कारवाई करा. त्यांना तीनपट कर लावून तो वसूल करा, असे आदेश दिले होते. त्यानंतर काही प्रमाणात ही कारवाई झाली आणि नंतर थंडावली. त्यानंतर आता निवासी मिळकतींमधील हॉटेल व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

PMC Pune
Nashik : अखेर महापालिकेकडून 706 पदे भरतीचा मुहूर्त जाहीर

निवासी जागेतील हॉटेलमुळे अडचणी काय?
- पार्किंग उपलब्ध नसल्याने गाड्या रस्त्यावर लावल्या जातात
- वाहतूक कोंडी निर्माण होते
- रात्री उशिरापर्यंत गोंधळ असल्याने रहिवासी भागातील शांतता भंग पावते
- पबमधील स्पीकरचा आवाजाचा त्रास
- हॉटेल, पब, रेस्टॉरंटमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेशी उपाययोजना नाही

पुण्यातील मिळकती
निवासी - १२ लाख
बिगर निवासी - २.१४ लाख
एकूण - १४.१९ लाख
हॉटेल, रेस्टॉरंट - ६५००
बार - १०००

PMC Pune
भुमरेंच्या खात्यात घोटाळा? 70 कोटींच्या टेंडरची SIT चौकशी करा

निवासी इमारतीमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट यासह इतर व्यवसाय सुरू करायचे असल्यास त्याचा जागा वापरात बदल करण्यासाठी परवानगी आवश्‍यक आहे. ज्यांच्याकडे ही परवानगी नाही अशा मिळकतींना बिगर व्यावसायिक कर लावून त्यांची तीनपट दराने वसुली करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
- अजित देशमुख, उपायुक्त, मिळकतकर विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com