Pune: पुणेकरांसाठी गुड न्यूज; मुळा मुठा नदीसुधारला येणार वेग, कारण

Pune Mula-Mutha Rive
Pune Mula-Mutha RiveTendernama

पुणे (Pune) : मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाचे भूमीपूजन होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या एका वर्षात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे डिझाइन अंतिम करणे, जुने प्रकल्प पाडून टाकणे यामध्येच बहुतांश वेळ आणि पैसा खर्च झाला आहे. सध्या सहा सांडपाणी शुद्धीकरण केंद्राचे काम प्राथमिक स्तरावर सुरू आहेत. ‘एसटीपी’ बांधण्यासाठीचा भूसंपादनाचा अडथळा दूर झाल्याने आता एकावेळी सर्व ठिकाणी काम सुरू करता येणार आहे. त्यामुळे २०२३-२४ या वर्षभरात सुमारे ३०० कोटींची कामे होणार आहेत. वर्षभरात या प्रकल्पाचे काम ३५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

Pune Mula-Mutha Rive
Good News : जुनी पेंशन लागू करण्याबाबत केंद्राची मोठी घोषणा

दिल्लीत यासंदर्भात एक बैठक नुकतीच झाली. त्यामध्ये या प्रकल्पाचा केंद्र सरकार व जपानच्या जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीतर्फे (जायका) याचा आढावा घेण्यात आला. पुणे महापालिकेने चार हजार ७०० कोटी रुपये खर्च करून नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. सध्या संगमवाडी ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा यादरम्यान नदी सुधारचे काम सुरू आहे. पुण्यातील नदी सुंदर झाली, तरी त्यातील पाणीदेखील स्वच्छ होणे आवश्‍यक आहे. शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत येत असल्याने पर्यावरणाच्यादृष्टीने धोका निर्माण झाला आहे.

सध्या मुळा-मुठा नदीमध्ये दररोज ८८३ एमएलडी मैलापाणी येत आहे. त्यापैकी सुमारे ५५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जात आहे. पण, ही यंत्रणा पुरेशी नसल्याने २०४७ पर्यंतचा विचार करून ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नदी सुधार प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे.

Pune Mula-Mutha Rive
Navale Bridge : कात्रज-देहूरोड बायपासबाबत मोठी घोषणा

या प्रकल्पाअंतर्गत ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र, ११३ किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या टाकणे, जीआयएस, एआयएस, स्काडा यंत्रणा उभारणे, कम्युनिटी टॉयलेट ब्लॉक उभारणे, अशा १३ पॅकेजेसच्या कामांचा समावेश आहे. प्रकल्पपूर्तीनंतर त्याचे पंधरा वर्षे संचलन करणे, देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीवर राहणार आहे.

२०१५ मध्ये या प्रकल्पासाठी ९९०.२६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत होता. त्यामध्ये केंद्र सरकारकडून ‘जायका’चे ८४१.७२ कोटी रुपये कर्ज महापालिकेला मिळाले. मात्र, प्रशासकीय दिरंगाई, निविदा प्रक्रियेतील घोळ यामुळे तब्बल सहा वर्षे विलंब झाला. त्यामुळे त्याचा खर्चही एक हजार ४६० कोटी रुपयांवर गेल्याने महापालिकेवर ४५९ कोटींचा बोझा निर्माण झाला आहे. २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आहे.

Pune Mula-Mutha Rive
Nashik ZP : 'जलजीवन'च्या 185 योजनांचे घोंगडे अडकले कुठे?

गेल्या वर्षभरात झालेले काम
- सहा मार्च २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन
- भूमिपूजनानंतर नायडू व भैरोबा हे जुने प्रकल्प पाडले
- तेथील मैला व राडारोड्याची विल्हेवाट लावली
- या दोन केंद्रासह मत्सबीज केंद्र हडपसर, धानोरी, वारजे, वडगाव बुद्रूक येथील कामाला सुरुवात
- बॉटॅनिकल गार्डन औंध, मुंढव्यातील एसटीपीचे बेसिक इंजिनिअरिंग पॅकेज (बीईपी) तयार केले
- १९ पैकी चार ठिकाणांच्या मलवाहिनीचे अंतिम आराखडे निश्चित झाले
- वर्षभरात या कामावर १६५ कोटींचा खर्च

Pune Mula-Mutha Rive
Nashik : 'स्मार्ट रोड'ची वाट लागल्यानंतर आता 25 कोटीचा 'मॉडेल रोड'

मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. पुढच्या वर्षभरात ३०० कोटी रुपये खर्च करून ३५ टक्क्यापर्यंत काम नेले जाईल. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. यासंदर्भात आढावा घेण्यासाठी नुकतीच दिल्ली येथे एक बैठक झाली.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com