MSRT's U-Turn; 'लालपरी'चा प्रवास इलेक्ट्रिककडून पुन्हा CNGकडे का?

ST Mahamandal
ST MahamandalTendernama

पुणे (Pune) : राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) डिझेलवर धावणाऱ्या एसटी बसेसचे (ST Bus) रूपांतर सीएनजीवर (CNG) धावणाऱ्या गाडीत केले आहे. त्यामुळे राज्यात लवकरच एक हजार एसटी बस ‘सीएनजी’वर धावताना दिसणार आहेत.

ST Mahamandal
RoofTopSolar: वीज बिल झिरो उलट महावितरणच पैसे देणार; अशी आहे योजना

हा बदल योग्य असून त्यात कोणत्याही प्रकारचा दोष नसल्याने ही एसटी प्रवासी सेवेत धावण्यासाठी योग्य असल्याची मंजुरी हरियाना येथील आयकॅट (इंटरनॅशनल सेंटर फॉर ॲटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी) संस्थेने दिली. त्यामुळे लालपरी सीएनजीवर धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ST Mahamandal
Covid Scam:अंबरनाथ नगरपरिषदेवर कोर्टाचे ताशेरे; 15 कोटीचा मलिदा...

राज्यात ‘सीएनजी’चा सर्वदूर पुरवठा नसल्याने राज्य परिवहन महामंडळाने ज्या ठिकाणी सीएनजी पुरवठा होईल, त्याच ठिकाणी ही सेवा देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात डिझेलवर धावणाऱ्या एक हजार एसटीचे रूपांतर सीएनजीमध्ये केले जाईल. केवळ शहरी भागापुरतीच ही सेवा असेल. या प्रक्रियेसाठी तसेच डेपोमध्ये सीएनजी पुरवठा करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.

ST Mahamandal
Aurangabad: शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामातील अडथळा दूर

आयकॅट ही हरियानामधील मनेसारस्थित आंतरराष्ट्रीय स्तरांवरील वाहन क्षेत्राशी निगडित संस्था आहे. एसटी प्रशासनाने दापोडीच्या कार्यशाळेत एसटीतील डिझेलवरील इंजिनमध्ये बदल करून ती सीएनजीवर धावेल, अशी रचना केली. जानेवारी २३ मध्ये ही एसटी आयकॅटमध्ये परीक्षण व मंजुरीसाठी दाखल झाली. विविध प्रकारच्या चाचण्या घेऊन ही एसटी सीएनजीवर धावण्यास सक्षम असल्याचे प्रमाणपत्र परिवहन महामंडळाला देण्यात आले आहे.

ST Mahamandal
Nashik : झेडपी म्हणते, रस्ता चोरीला गेलाच नाही; आता तक्रार...

राज्य परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बसची खरेदी केल्यावर ‘सीएनजी’वर बस खरेदीचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. दापोडीच्या कार्यशाळेत त्या बसची प्रतिकृती तयार केली. याशिवाय, राज्यात ‘सीएनजी’चा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा केली. मात्र, अचानक सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची क्षमता कमी आहे. तसेच राज्यांत सीएनजीचा सर्वदूर पुरवठा नसल्याचे कारण सांगत सीएनजीवर सेवा न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्या निर्णयावरून परिवहन महामंडळाने ‘यू टर्न’ घेतला आहे.

ST Mahamandal
Aurangabad: कोणी अडवली औरंगाबादच्या विकासाची वाट? जाणून घ्या कारण

आयकॅट संस्थेकडून राज्य परिवहन महामंडळाला ‘सीएनजी’वर धावण्यास एसटी बसेस सक्षम असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. आरटीओ प्रशासनाकडे गाडीची योग्यता प्रमाणपत्र घेतानाची चाचणी सुरु आहे. त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळताच एक हजार डिझेल बसेसचे सीएनजीमध्ये रूपांतर केले जाईल.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

ST Mahamandal
Pune: 'या' कारणांमुळे रखडली समान पाणी पुरवठा योजना

राज्य परिवहन महामंडळाची स्थिती
- राज्यातील एसटी बस : १६ हजार

- दैनंदिन डिझेलचा वापर : १२ लाख लिटर

- रोजचे उत्पन्न : १४.५० कोटी रुपये

- डिझेलवर होणारा रोजचा खर्च : १० कोटी रुपये

- वर्षाचा डिझेलचा खर्च : ३ हजार कोटी रुपये

- एकूण विभाग : ३७

- एकूण डेपो : २५०

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com