दुधगंगा प्रकल्प : अनियमिततेप्रकरणी 'तो' कार्यकारी अभियंता निलंबित

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Tendernama

मुंबई (Mumbai) : कोल्हापूर जिल्ह्यातील आंतरराज्य प्रकल्प असलेल्या दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाच्या डावा कालव्याच्या कामात अनियमितता आणि सुधारित तांत्रिक मान्यता न घेता काम करणे आदी कारणांमुळे दुधगंगा डावा कालवा क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंत्यास तत्काळ निलंबित करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत लक्षवेधीवेळी दिली.

Devendra Fadnavis
नाशिक-मुंबई वाहतूक कोंडीवर अखेर मुख्यमंत्र्यांचा तोडगा, पाहा काय?

फडणवीस म्हणाले की, दुधगंगा डावा कालवा कि.मी. 32 ते 76 च्या टेंडरसंदर्भात सखोल चौकशी करून प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यासाठी दक्षता पथक, पुणे यांना कळविण्यात आले होते. त्यांच्या अहवालानुसार या प्रकरणी अनियमितता तसेच अतिप्रदान झाल्याचे निष्पन्न झाल्याने जबाबदार असणारे अधिकारी व कर्मचारी यांचे दोषारोप पत्र दक्षता पथकाकडून मागवण्यात आले. त्यांच्या अहवालानुसार प्रशासकीय अनियमिततेस जबाबदार असणाऱ्या एकूण 46 अधिकाऱ्यांपैकी 4 अधिकारी मयत व 41 अधिकारी निवृत्त झाले होते. ही अनियमितता 2002 ते सन 2013 या कालावधीत झालेली आहे. निवृत्त 41 अधिकाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कारवाई करणे शक्य झाले नाही. यातील एक अधिकारी केंद्र शासनाच्या महालेखापाल कार्यालयाच्या अखत्यारीत असल्याने त्याच्या विरुद्धचे दोषारोप पत्र सक्षम प्राधिकारी या नात्याने महालेखापाल कार्यालय, नागपूर यांना सादर करण्यात आले. त्यांच्याकडून कार्यवाही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

Devendra Fadnavis
'त्या'रस्त्याच्या निकृष्ट कामासाठी ठेकेदारावर जबाबदारी निश्चित करा

दूधगंगा डावा कालवा कि. मी. 32 ते 76 मधील मातीकाम अस्तरीकरण व बांधकामाच्या कामाप्रकरणी अतिप्रदानाची रुपये 3.48 कोटी इतकी रक्कम ठेकेदाराकडून वसूल करण्यात आल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. यावेळी सदस्य प्रताप अडसड, रत्नाकर गुट्टे यांनीही चर्चेत भाग घेतला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com