Maharashtra: कारागृहांच्या सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेरे,एक्स-रे मशीन्स

Drone
DroneTendernama

मुंबई (Mumbai) : राज्यातील कारागृहांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी ड्रोन कॅमेरे आणि बॅगेज एक्स-रे मशिनच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. कारागृह प्रशासनाकडून एकूण 12 ड्रोन कॅमेरे आणि 4 बॅगेज स्कॅनर खरेदी केली जाणार आहेत.

Drone
Bullet Train : बुलेट ट्रेनच्या ठाण्यातील डेपोसाठी 15 मार्चला टेंडर

राज्यात एक महिला, विशेष, किशोर सुधारालय, 19 खुली कारागृहे आणि एक खुली वसाहत अशी एकूण 60 कारागृहे आहेत. त्यापैकी येरवडा, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, मुंबई मध्यवर्ती, ठाणे आधारवाडी इत्यादी कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक बंदिवानांना ठेवण्यात आले आहे, त्यात सर्वाधिक बंदिवान हे न्यायबंदी आहेत. बंदिवानांच्या वाढत्या संख्येबरोबर तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची आहे.

Drone
Nashik : वनविभागाकडून टेंडर, वर्कऑर्डर न करताच 46 कोटींची कामे

तुरुंगाच्या आत आक्षेपार्ह वस्तू आणि पदार्थ पाठवले जात असल्याचा अनेकवेळा आरोप करण्यात आला आहे. तुरुंगात बाहेरून येणारे बंदिवान, न्यायबंदी चोरून लपून छपून वस्तू तुरुंगात घेऊन जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. या सर्वांवर चाप बसविण्यासाठी तसेच तुरुंगाच्या सुरक्षा व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी ड्रोन कॅमेरे आणि एक्स-रे बॅगेज स्कॅनर सिस्टीमची गरज असल्याचे कारागृह प्रशासनाकडून गृहविभागाला पत्रव्यवहाराद्वारे कळविण्यात आले होते. राज्य शासनाच्या गृहविभागाकडून ड्रोन कॅमेरे आणि एक्स-रे स्कॅनर खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. गृहविभागाकडून ड्रोन कॅमेर्‍यांसाठी 1 कोटी 80 लाख तर बॅगेज स्कॅनरसाठी 1 कोटी 94 लाख रुपये असे एकूण 3 कोटी 74 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com