खारघर ते सीबीडी बेलापूर 7 किमी खाडीकिनारा प्रकल्प सुसाट! केंद्राचा हिरवा कंदील

Kharghar
KhargharTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : गेल्या ८ वर्षांपासून रखडलेल्या खारघर ते सीबीडी बेलापूर खाडीकिनारा प्रकल्पाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने या कामाला नुकतीच परवानगी दिली आहे. खारघर ते सीबीडी बेलापूर हा ६.९६ किलोमीटरचा खाडीकिनारा प्रकल्प आहे.

Kharghar
जलजीवन मिशन : 'या' शहरातील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी

'सिडको'ने नवी मुंबई प्रकल्प उभारण्याचा संकल्प हाती घेताना तळोजा, कळंबोली आणि खारघरवासियांना नवी मुंबई विमानतळाकडे विना अडथळा जाता यावे यासाठी कोस्टल रोड बांधण्याचा निर्णय घेतला. या कोस्टल रोडसाठी सिडकोने २०१८ मध्ये २७३ कोटीचे टेंडर काढले होते. तसेच, पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळावी यासाठी 'सिडको'कडून प्रयत्न सुरु होते. अखेर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारच्या 'पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय'च्या 'तज्ञ मूल्यांकन समिती'ने कोस्टल रेग्युलेशन झोननुसार खारघर ते सीबीडी-बेलापूर, सेटर-१५ दरम्यान उभारल्या जाणाऱ्या कोस्टल रोडच्या बांधकामाला परवानगी दिली. त्यामुळे खारघर ते सीबीडी दरम्यान होणार्‍या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.

Kharghar
Mumbai : 'त्या' 1 हजार कोटींच्या टेंडरसाठी दोन दक्षिणी कंपन्यांमध्ये चुरस

पुणे-मुंबईकडे जाणार्‍या नागरिकांना नवी मुंबई पामबीच आणि कोस्टल रोडने थेट खारघर टोल नाक्यापर्यंत विना अडथळा जाता येणार आहे. खारघर ते सीबीडी सेटर-१५ खाडीकिनारा अंदाजे ६.९६ किलोमीटर अंतराचा कोस्टल रोड आहे. तळोजा-खारघर मधील नागरिकांना सीबीडी, सेटर-११ मार्गे मार्गे नवी मुंबई विमानतळावर विना अडथळा जाता येणार आहे. यामुळे खारघर-सीबीडी बेलापूर दरम्यान होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. कोस्टल रोडमुळे खारघर कार्पोरेट पार्क, फुटबॉल स्टेडियमचा प्रवास सुखकर होणार आहे. खारघर टोल नाकादरम्यान सायन-पनवेल महामार्गावर पूल उभारुन रस्ता केला जाणारा असल्यामुळे भविष्यात खारघर सेटर-१५, १६ ते १८ येथील नागरिकांची सोय होणार आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com