नवी मुंबईत 500 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल; 800 कोटींचे बजेट

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)Tendernama

मुंबई (Mumbai) : नवी मुंबईत (Navi Mumbai) लवकरच सुमारे साडेआठ एकर परिसरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार असून, त्यासाठी सुमारे ८१९ कोटी खर्च येणार आहे. यासंदर्भात नवी मुंबई महापालिका (NMC) आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे सादरीकरण पार पडले. यावेळी स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे (Manda Mhatrey) उपस्थित होत्या.

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
ST : मे अखेरीस पुणे-मुंबई मार्गावर धावणार 'एवढ्या' ई-शिवनेरी

हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय दहा मजल्यांचे असणार आहे. तसेच येथे कॅन्सर, हृदय, मेंदू अशा अनेक मोठ मोठ्या आजारांवर सेवा दिली जाणार आहे. या आजारांच्या उपचाराकरिता लागणारी सर्व यंत्रणा, शस्त्रक्रिया व इतर सुविधा ह्या प्रत्येक मजल्यावर उपलब्ध होणार आहेत. तसेच हॉस्पिटलमधील रुग्णाची क्षमता ही 500 बेड हून अधिक असून, हॉस्पिटल पूर्णत: सर्व सुविधांयुक्त बनणार आहे.

याठिकाणी पीजी/नर्सिंग शैक्षणिक वसतिगृह, पदव्यूत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्याकरिता धर्मशाळा, नर्सिंग वसतिगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, वाहनतळ व इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच या उभारल्या जाणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजवर पूर्ण नियंत्रण हे नवी मुंबई महानगरपालिकेचे असणार आहे व या प्रकल्पामध्ये अजून काही सुविधा व उपाययोजना करता येतील का, याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रशासनाला दिले.

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Nashik: निओ मेट्रोसाठी हालचाली; चेहडी, गंगापूर येथे होणार भूसंपादन

याबाबत आमदार म्हात्रे म्हणाल्या की, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सुसज्ज आरोग्य सुविधा मिळणे हे अत्यावश्यक आहे. पुढील काही वर्षात नवी मुंबईत होणारा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज नवी मुंबईकरांसाठी क्रांती ठरेल. तसेच नवी मुंबई हद्दीतील रुग्णांना उपचाराकरिता बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे रुग्णांचा वेळ व पैसा वाचणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण आहे.

यावेळी म्हात्रे यांनी सांगितले की, प्रकल्प हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी व नवी मुंबई महानगरपालिका, सिडको मधील संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे उभा राहणार आहे. लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com