'टेंडरनामा' वृत्तमालिकेनंतर 16 वर्षांनी जागांबाबत महापालिकेला झाला साक्षात्कार

Aurangabad
AurangabadTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : १५ मीटर रस्ते रूंद विकास योजनेतील शेकडो जागा महापालिकेच्या नावे नाहीत. महापालिकेने जागा भुसंपादीत केल्या. काही जागा मालकांना रोख स्वरूपात मोबदला दिला. काही जागा मालकांना टीडीआर तर काही जागा मालकांना डी.आर.सी.प्रमाणपत्र दिले. टीडीआर आणि डी.आर.सी. प्रमाणपत्र घेऊन अनेकांनी त्याचा वापर इतरत्र केला. काहींनी प्रमाणपत्र इतरांना विकुन मालामाल झाले. मात्र, महापालिका कारभाऱ्यांनी भुसंपादीत जागा ताब्यात घेतल्या नाहीत. जागा रितसर मालकीहक्कात नोंदवल्या नाहीत. परिणामी सदर जागांच्या पीआर कार्डवर जुन्याच मालकाचे नाव असल्याने त्याचा पुरेपुर फायदा उचलत अनेकांनी दुकानदारी सुरू तर काहींनी भाडेवसुली सुरू केली. तर अनेकांनी मालकी हक्काचा फायदा घेत जागांची परस्पर विक्री केली आहे.

Aurangabad
Shinde, Fadnavis, Pawar : राज्य सरकारचे आता 'रस्ते विस्तार मिशन'; तब्बल 5 हजार कोटींतून...

टेंडरनामा वृत्तमालिकेनंतर नेमली पथके

तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ.पुरूषोत्तम भापकर यांची बदली झाली आणि रस्ते रूंद विकास योजना बारगळली. 'टेंडरनामा'ने यासंदर्भात सविस्तर वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी नगररचना विभागातील उप संचालक व एका अतिरिक्त आयुक्तांच्या देखरेखीखाली स्वतंत्र दोन पथके तयार केले आहेत. यात नगररचना विभागातील अधिकारी पंधरा टक्के भुखंडाची यादी अद्यावत करून सर्वेक्षण करत आहेत. दुसरीकडे रस्ते रूंद विकास योजनेतील भुसंपादीत जागांचा शोध अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शेनाखाली सुरू आहे.

पहिल्या टप्प्यात शोधल्या ८० जागा

यात पहिल्या टप्प्यात ८० जागांचा शोध महापालिका पथकाने लावला आहे. सदर जागांच्या बदल्यात कोट्यावधी रूपयांचा मोबदला देऊनही जागेच्या मालकीहक्कात महापालिकेचे नाव नसल्याचे समोर आले आहे. याचा साक्षात्कार झाल्यानंतर तसा वस्तुनिष्ठ अहवालच महापालिका प्रशासकांकडे सादर करण्यात आला आहे. सदर जागेवरील अतिक्रमण भुईसपाट करून जागा ताब्यात घेण्याचे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

Aurangabad
Eknath Shinde : महाराष्ट्राचा जीडीपीत 15 टक्के वाटा; 30 टक्के विदेशी गुंतवणूक

नेमके काय चुकले कारभाऱ्यांचे

मुळात रोख रक्कम, टीडीआर आणि डी.आर.सी. प्रमाणपत्र दिल्यानंतर महापालिकेने शहर रस्ते रूंद विकास योजनेअंतर्गत संपादीत केलेल्या जागा तातडीने ताब्यात घेऊन नगरभुमापण अधिकारी कार्यालयात सर्व संपादीत जागांची एकत्रित यादी करून पीआर कार्डवर नाव नोंदवने आवश्यक होते. मात्र  अनेकांनी या जागांवर 'सबका साथ सबका विकास' केल्याने त्याकडे 'अर्थपुर्ण' दुर्लक्ष केले. टेंडरनामा वृत्तानंतर महापालिका प्रशासकांनी नेमलेल्या पथकाला रस्त्यांसाठी संपादीत केलेल्या जागांवर व्यावसायिक गाळे बांधून काहींनी दुकानदारी तर काहींनी परस्पर भाड्याने देऊन भाडेवसुली करत असल्याचे समोर आले आहे.

सोळा वर्षांनंतर होणार पुन्हा पाडापाडी

त्यामुळे सिंगमफेम तत्कालीन महापालिका आयुक्त  डाॅ. पुरूषोत्तम भापकर यांच्या काळात झालेल्या पाडापाडीनंतर तब्बल सोळा वर्षानंतर सदर शहर रस्ते रूंद विकास योजनेअंतर्गत संपुर्ण जागांचा शोध लागल्यानंतर पुन्हा पाडापाडी होणार याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. सदर जागांचे सर्वेक्षण सुरू असल्याने जुन्या शहरात भल्याबल्यांनी धास्ती घेतली आहे. याच बरोबर आता महापालिका प्रशासक डाॅ. जी. श्रीकांत यांनी महापालिकेच्या रेखांकनातील पंधरा टक्के भुखंडांची यादी अपडेट करण्यासाठी नगररचना विभागातील यंत्रणेला कामाला लावले आहे. याचेही सर्वेक्षण झाल्यानंतर सदर मंजुर रेखांकनातील पाच टक्के जागाही ताब्यात घेतली जाणार आहे.

Aurangabad
Mumbai : पलावा ते काटई उड्डाणपुलाची एक मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू होणार

काय आहे नेमके प्रकरण

जुन्या शहरातील विकास आराखड्याची मुदत २०२२ मध्येच संपली होती. त्यानंतर नव्या विकास आराखडयाचे काम देखील अंतीम टप्प्यात आले आहे. परंतु, काही वर्षांपूर्वी झालेल्या जुन्या विकास आराखड्यात जुन्या शहरातील रस्त्यांची रुंदी ठरवण्यात आली होती, त्यानुसार तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. पुरूषोत्तम भापकर यांनी सदर विकास आराखड्यानुसार रुंदीकरण मोहीम राबवली होती. मात्र भापकरांची बदली झाल्यानंतर रूंदीकरण मोहीम बारगळली. तद्नंतर तत्कालीन महापालिका प्रशासक यांनी २०१६-१७ च्या दरम्यान मोहीम सुरू केली. मात्र ही मोहीम सुरू केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. भापकरांनी जुन्या शहराचे हृदय म्हणून ओळखली जाणारी गुलमंडी, सिटी चौक, पानदरिबा, सराफा व अन्य रस्ते रूंदीकरण मोहीम सुरू केली होती. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळाली होती. मात्र पुढे ही मोहिम बारगळली.दरम्यानच्या काळात शहर विकास आराखड्यातील रस्ते रूदीकरण योजनेसाठी भुसंपादन केलेल्या मालमंत्ताधारकांना कोट्यावधीचा मोबदला देण्यात आला होता. काहींना टीडीआर आणि डी.आर.सी. प्रमाणपत्र देखील देण्यात आले होते.
 
जागेचा ताबा मालमत्ताधारकांकडेच कोट्यावधीचे रस्ते अरूंद

रस्ते रूंदीकरणासाठी जागांचे भुसंपादन केले. पण पुढे मोहिम बारगळली. यात जागेचा मोबदला लाटणार्यांनी पुढे दुकाने थाटली. परिणामी सरकारी निधीतून कोट्यावधी रुपयांतून जुन्या शहरात रस्त्यांची कामे केली गेली. मात्र ही कामे रूंदीकरण न करताच केली गेली. भुसंपादन आणि मावेजा दिला असतांनाही कारभार्यांनी ऐनवेळी भूसंपादन शक्य नसल्याचे म्हणत जनतेची दिशाभूल केली. त्यामुळे ठेकेदार पूर्ण रस्त्याच्या कामासाठी टेंडर  भरतात, पण रुंदीकरण झालेले नसल्याने प्रत्यक्षात काम मात्र अरुंद रस्त्याचे केले जाते. यात ठेकेदारांचा फायदा होतो. कोट्यावधींच्या रस्त्यांच्या यादीत सिटी चौक ते दलालवाडी मार्गे पैठण गेट या रस्त्याचे रुंदीकरण न करता सिमेंट रोड करण्यात आला. असे अनेक रस्त्यांच्या बाबतीत घडले.

या रस्त्यांवरील टी.डी.आर. डी.आर.सी. आणि रोख रकमा दिलेल्या जागांचे सर्वेक्षण सुरू

सिटी चौक ते दलालवाडी पुढे पैठण गेट रंगारगल्ली 

गुलमंडी ते पानदरिबा 

पानदरिबा ते सराफा 

सराफा ते पुढे लेबर कॉलनी 

दमडी महल ते शहाबाजार 

शहाबाजार ते जालना रोड 

हॉटेल अमरप्रीत ते पानदरिबा 

सुपारी हनुमान ते पानदरिबा 

महात्मा फुले चौक, औरंगपुरा ते सिटी क्लब 

नाज गल्ली ते सराफा 

बारुदगर नाला ते पुढे शहागंज 

संस्थान गणपती राजाबाजार ते जिन्सी पोलिस ठाणे 

टाउन हाॅल उड्डाणपुल ते मकई गेट

लक्ष्मणचावडी ते कैलासनगर स्मशानभुमी

जीन्सी ते राजाबाजार ते कुंभारवाडा

जिन्सी पोलिस ठाण्यापासून पुढे एमजीएम

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com